LIVE UPDATES

निराधार आजीला सामाजिक बांधिलकीचा आधार

Edited by:
Published on: November 08, 2026 06:49 PM
views 79  views

सावंतवाडी : मुलांच्या शोधात गोव्यावरून सावंतवाडीला आलेल्या आजीला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून आधार देण्यात आला.  सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रूपाली मुद्राळे, हेलन निबरे व रवी जाधव यांनी श्रीमती कमलावती हुबलेकर (फोंडा-गोवा) या सावंतवाडी  बाजारपेठेत रडत असताना दिसून आल्या. पिंगुळकर नामक एका व्यक्तीने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे व हेलन निब्रे यांनी पोलिसांची मदत घेऊन तिला संविता आश्रम या सेवाभावी आश्रमात आधार मिळवून दिला.