
कणकवली : महसूल विभागात तब्बल ३६ वर्षे प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षपणे सेवा बजावणारे तहसीलदार रमेश पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, महसूल विभागातील ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत रमेश पवार यांनी प्रशासनात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा भविष्यातही समाजाला आणि प्रशासनाला होत राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पवार यांना निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून आपल्या अनुभवाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा, अशी भावना व्यक्त करत पालकमंत्र्यांनी रमेश पवार यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी भाजप नेते सतीश सावंत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, वैभववाडी निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील, महसूल सहाय्यक देवगड पावस्कर, मंडळ अधिकारी मिठबाव श्रीकांत जाधव, महसूल सहाय्यक वैभववाडी संभाजी खाडे, देवगड प्रभारी तहसीलदार संतोष खरात, वैभववाडी उपलेखापाल संतोष नागावकर, बापार्डे मंडळ अधिकारी विनायक शेटे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पुरवठा निरीक्षक संग्राम गुंठे महसूल सहाय्यक आबासाहेब पाटील, बोथेकर, उपस्थित होते











