
पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती ; शासकीय जागेवर उभारण्यात येणार पर्यटन केंद्र
देवगड
देवगड शहरातील शासकीय जागेवर उभारण्यात येणाऱ्या पर्यटन केंद्राच्या विकासकामाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते रविवारी, ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून हा विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, या कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती खासदार नारायण राणे ,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू , जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.











