LIVE UPDATES

निरवडेतील चार रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन

जिल्हाप्रमुख संजू परब यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 03:10 PM
views 30  views

सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

यामध्ये सावंतवाडी-शिरोडा रस्ता ते निरवडे पलताडवाडी, पलताडवाडी ते बाईतवाडी, शिरोडा रस्ता ते विष्णुप्रसाद सोसायटी तसेच भाईडवाडी ते शेटकरवाडी या चार रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे गावातील नागरिकांची दळणवळणाची सोय अधिक सुलभ होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी निरवडे सरपंच सुहानी सुहास गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, ज्येष्ठ ग्रामस्थ लाडू गावडे, सुहास गावडे, सुभाष गावडे, नामदेव गावडे, धर्मा माळकर, नारायण माळकर, बाळ्या बाईत, उमाकांत गावडे, अक्षय गावडे, सूरज गावडे, साहिल परब, साबाजी गावडे, बादल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गावाच्या वतीने सरपंच सुहानी गावडे यांनी आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शिवसेना युवा नेते सूरज परब यांचे विशेष आभार मानले. गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
Nitesh Rane Meets Deepak Kapoor Over Sindhudurg Flight Connectivity
Sindhudurg Navi Mumbai Flight Service : चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
November 17, 2026