LIVE UPDATES

Gharda Chemicals CSR Initiative : घरडा केमिकल्सच्या सीएसआर निधीतून खेंड प्राथमिक शाळेला दोन संगणक संच भेट

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 06:34 PM
views 105  views
Gharda Chemicals Donates Computers to Khend Primary School

चिपळूण : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खेंड मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावत घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे-परशुराम कंपनीच्या सीएसआर निधीतून शाळेला दोन संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या संगणक संचांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी कंपनीने दिलेले हे सहकार्य निश्चितच मोलाचे आहे. या अनमोल सहकार्याबद्दल घरडा केमिकल्स लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन, कंपनीचे अधिकारी श्री. पवार आणि श्री.पाटील यांचे शाळेचे मुख्याध्यापक नरेश मोरे सर यांनी मनःपूर्वक आभार मानले .