
सावंतवाडी : खासकीलवाडा येथील लिकेज असणाऱ्या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नगरसेविका स्नेहा नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, गवस पाणंद येथे जून महिन्यापासून पाण्याची पाईपलाईन लिकेज असून वारंवार सांगूनही लक्ष दिलं जात नाही. पाणी फुकट जात असून ऐन जुलै महिन्यात लोकांना पाणी पुरवठा होत नाही. तसेच सिधीवाडा येथे देखील अशीच परिस्थिती असून चार नं. शाळा येथेही फुटलेल्या लाईनमुळे पाणी फुकट जात आहे. अधिकाऱ्यांनी येतो असं सांगूनही ते आले नाहीत. लोकांचे आम्हाला फोन येत असून लक्ष देत नसल्याची तक्रार ते करत आहे. मात्र, वारंवार सांगूनही नगरपरिषद लक्ष देत नाही. नगराध्यक्षांनाही याची कल्पना दिलेली आहे अशी माहिती नगरसेविका सौ. नाईक यांनी दिली.










