LIVE UPDATES

मंगल ज्ञान प्ले स्कूल व पाळणाघरात गणेश चतुर्थी उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 18:11 PM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : कणकवली बाजारपेठ मधील येथील Mangal Dnyan Play School & पाळणाघर येथे गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचा परिसर पारंपरिक पद्धतीने सुंदर सजविण्यात आला होता. विशेष म्हणजे ‘गावाकडची संस्कृती’ या संकल्पनेतून साकारलेली सजावट विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.

छोट्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत गणरायाचे भक्तिभावाने स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपूजन व आरतीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. आरती, भक्तिगीते आणि सामूहिक प्रसादाच्या माध्यमातून मुलांना आपली संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व आनंददायी पद्धतीने अनुभवता आले.

“खेळता खेळता शिक्षण आणि संस्कारांची जोड” या उद्देशाने Mangal Dnyan Play School & पाळणघरात विविध सण व उपक्रम मुलांसाठी आनंददायी पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे शिक्षणासोबतच मुलांमध्ये संस्कार, सामाजिक भावना, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उत्सवाचे आयोजन संचालिका पूर्वा वातकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सहशिक्षिका श्रावणी सुतार, वेदश्री तोरस्कर, लाजरी वाटकर तसेच मदतनीस सारिका सुतार व साधना नेरले यांनी विशेष सहकार्य केले.मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, भक्तिभाव आणि उत्साहाने संपूर्ण शाळेचे वातावरण गणेशमय झाले होते.