LIVE UPDATES

५ दिवसांचा आठवडा लागू करा

कणकवलीत बँक कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 18:20 PM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने आज देशव्यापी संप पुकारण्यात आला होता . त्याच अनुषंगाने आज कणकवली येथील सर्व राष्ट्रीयकृत बँका बंद ठेवण्यात आल्या.युनायटेड फोरम ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने आज स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र चा समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या 

प्रमुख मागण्या

५ दिवसांचा आठवडा लागू करा.

अन्यायकारी PLI  योजना रद्द करा.

PLI योजनेत आवश्यक ते बदल युनियन शी चर्चा करून करण्यात यावे.

द्विपक्षीय कराराचा उर्वरित मागण्या पूर्ण करा. 

या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आज एक दिवसीय देशव्यापि संप पुकारण्यात आला आहे. तसेच दिनांक २८, २९, ३० सप्टेंबर रोजी तीन संप पुकारण्यात आला असून तरी सुद्धा मागण्या मान्य न झाल्यास 26 ऑक्टोबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

आजच्या निदर्शनाचा वेळी बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक युनियन बँक कॅनरा बँक फेडरल बँक बँक ऑफ बडोदा या बँकेचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणे चे असिस्टंट सेक्रेटरी निखिल साटम, बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशनचे EC मेंबर ऋषिकेश गावडे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन कोल्हापूर चे अध्यक्ष संतोष रानडे, स्टेट बँक युनियन असिस्टंट रिजनल सेक्रेटरी श्रीकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज हा संप करण्यात आला