
सिंधुदुर्ग : शिवशौर्य प्रतिष्ठान परिवाराच्यावतीने किल्ले गगनगड येथे सालाबादप्रमाणे यंदा चौथ्या वर्षी दीपोत्सव सोहळा, गडदेवता पूजन आणि स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली. १४ व १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवशौर्य प्रतिष्ठान, श्री शिवशंभू प्रतिष्ठान, गगनबावडा यांच्यासह कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला.
१४ नोव्हेंबर रोजी गडपूजन, दीपोत्सव, गडदेवता पूजन, आई विठ्ठलाई देवीचे जागरण आणि शिव व्याख्यान झाले. व्याख्याते कु. साईशा पाटील (कोल्हापूर) यांनी शिव व्याख्यान सादर केले. १५ नोव्हेंबर रोजी गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १०० हून अधिक मावळे आणि रणरागिणी सहभागी झाले होते. या सोहळ्यास गगनगड ट्रस्टी संजय पाटणकर, नरवीर शिवा काशीद यांचे १३ वे वंशज आनंदराव रघुनाथराव काशीद, संतोष माने (शिवाज्ञा माने) आणि गगनबावडा माजी सरपंच नंदकुमार पोवार उपस्थित होते.
दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण करण्याची परंपरा जपत, सुमारे १००० पणत्यांनी किल्ले गगनगड उजळून निघाला. यावेळी मशाल महोत्सव आणि भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मंदिरातील देवांचे देवपण टिकून आहे आणि हिंदवी स्वराज्याचे अस्तित्व अबाधित आहे, ही भावना व्यक्त करत उपस्थितांनी महाराष्ट्राचे वैभव पुन्हा मिळवण्याचा संकल्प केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








