LIVE UPDATES

Ganeshotsav special train : गणेशोत्सवानिमित्त आमदार निलेश राणेंतर्फे मोफत 'शिवसेना एक्सप्रेस'

दादर ते कुडाळ धावणार रेल्वे : चाकरमान्यांकडून निर्णयाचे स्वागत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 13, 2026 16:28 PM
views 715  views

सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा व्हावा यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. कुडाळ-मालवण विधानसभेचे आमदार निलेश नारायण राणे यांच्या संकल्पनेतून 'शिवसेना एक्सप्रेस' ही विशेष गाडी १२ सप्टेंबर २०२६ रोजी दादरहून कुडाळसाठी रवाना होणार आहे. विशेष म्हणजे चाकरमान्यांसाठी हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग काही मिनिटांतच फुल्ल होते. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होते. आपल्या माणसांना आपल्या गावात पोहोचून कुटुंबासोबत बाप्पाचा उत्सव साजरा करता यावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो, अशी माहिती आमदार श्री. राणे यांनी दिली आहे.

या गाडीचे प्रस्थान दिनांक शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार असुन प्रवास मार्ग दादर रेल्वे स्थानक ते कुडाळ रेल्वे स्थानक असणार आहे‌. सीट बुकिंगची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ८४२५९०१२०२, ८४२५९०१५४५ बुकिंगची वेळ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० सोमवार ते शनिवार आहे. प्रवासादरम्यान अधिकृत सरकारी ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. बुकिंग ज्या व्यक्तीच्या नावाने झाली आहे, तीच व्यक्ती प्रवास करू शकेल, बुकिंग दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करता येणार नाही. गणेशोत्सवाच्या तोंडावर आमदार निलेश राणे यांच्या या उपक्रमामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून चाकरमान्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.