
वैभववाडी : आखवणे-भोम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंत राजाराम सुतार (वय ६५, रा. हेत-शेवरीफाटा) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ‘अंतू आबा’ या नावाने ते परिसरात परिचित होते. सुतार यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच म्हणून काम करताना गावाच्या विकासात योगदान दिले. धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारे, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या निधनाने आखवणे-भोम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे, भाऊ, बहिणी, पुतणे व पुतणी असा परिवार आहे.
ताजी बातमी
View all

रेल्वे प्रवासात अल्पवयीन मुलीची छेडछाड
November 29, 2026

दरडोई उत्पन्नात दरवर्षी ५० हजारांची वाढ करण्याचे लक्ष्य
November 29, 2026

ग्रामपंचायतीचा एक रुपयाही खर्च करू नका
November 29, 2026

डॉ. रमाकांत गावडे यांना इंडोनेशियात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
November 29, 2026
संबंधित बातम्या
View all

रेल्वे प्रवासात अल्पवयीन मुलीची छेडछाड
November 29, 2026

दरडोई उत्पन्नात दरवर्षी ५० हजारांची वाढ करण्याचे लक्ष्य
November 29, 2026

ग्रामपंचायतीचा एक रुपयाही खर्च करू नका
November 29, 2026

डॉ. रमाकांत गावडे यांना इंडोनेशियात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
November 29, 2026




