
देवगड : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि संकटग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी माजी राज्यमंत्री तथा समता परिषद, मुंबईचे अध्यक्ष विजय (भाई) गिरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. याबाबतचा धनादेश त्यांनी आज विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
भाई गिरकर यांनी विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील दुष्काळग्रस्त आणि विविध संकटांनी बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रदान केला.
संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेल्या या आर्थिक सहकार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. तसेच या उपक्रमाबद्दल विजयभाई गिरकर यांचे आभार मानले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








