
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप शिरोडा महिला मोर्चा कडून हिंदू युवतींमध्ये जनजागृती होण्यासाठी लव्ह जिहाद वर लिहिलेले "जिहाद का आणि किती? या पुस्तकाचे घरोघरी जाऊन मोफत वितरण करण्याचा अनोखा उपक्रम करण्यात आला.
भारतात सुरु असलेला लव्ह जिहाद,कार्पॊरेट जिहाद,यामुळे हिंदू धर्मातील युवतीवर होणारे अत्याचार याबाबत जनजागृती होण्यासंदर्भात हा उपक्रम राबविण्यात आला. सांस्कृतिक वार्तापत्र यांनी प्रकाशित केलेले "जिहाद का आणि किती?" या पुस्तकाचे हिंदू युवतीच्या घरोघरी जाऊन मोफत वितरण करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी २ आँगस्ट रोजी करण्यात आला. भाजप शिरोडा महिला मोर्चाचे शिरोडा ग्रामपंचायच्या सदस्या हेतल गावडे, भाजप शिरोडा महिला मोर्चा पदाधिकारी गंधाली करमळकर, स्नेहा गोडकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य रेखा नाईक, अर्चना नाईक यांनी घरोघरी जाऊन हिंदू युवतींना पुस्तकाचे मोफत वितरण केले.
या वितरण कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर, शहर अध्यक्ष अमित गावडे, तालुका युवा मोर्चा सदस्य सोमाकांत सावंत, बूथ अध्यक्ष चंद्रशेखर गोडकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर नार्वेकर, भाजप पदाधिकारी नितिन तारी, भाजप युवा नेता संतोष धानजी त्याच प्रमाणे केरवाडा ग्रामस्थ किरण मसुरकर यांचे सहकार्य लाभले.











