LIVE UPDATES

Job : कोकण रेल्वेत नोकरीची संधी! 12 पदांसाठी 201 जागांची भरती, असा करा अर्ज...

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 21:16 PM
views 196  views

मुंबई : महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील उमेदवारांना कोकण रेल्वेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. कोकण रेल्वेमार्फत 12 पदांसाठी 201 जागांची भरती होणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑगस्ट 2026 च्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. याबाबतची अधिसूचना 31 जूलै 2026 रोजी कोकण रेल्वेमार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे.

यामध्ये ज्युनिअर इंजिनिअर, सीनिअर सेक्शन इंजिनिअर, स्टेशन मास्टर, सेक्शन कंट्रोलर, असिस्टंट लोको पायलट, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवायझर, टेक्निशियन-III, इएसटीएम-III आणि ट्रॅक मेंटेनर अशा विविध पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत किमान गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन संपादित झालेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच रोजगार विनिमय कार्यालयात नोंदणी असलेल्या उमेदवारांना द्वितीय प्राधान्य दिले जाईल. संगणकावर आधारित परिक्षा घेतली जाऊ शकते. ही परिक्षा सप्टेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता असून, परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे.

दरम्यान, ग्रुप C मधील पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३६ वर्षे, तर ट्रॅक मेंटेनर पदासाठी १८ ते ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांना विविध टप्पे पार पाडावे लागणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन काळजीपूर्वक जाहिरात तपासावी. 

जाहिरात पाहण्यासाठी येथे करा क्लिक...

https://konkanrailway.com/sites/default/files/2026-07/EMPLOYMENT_NOTIFICATION_310726_1.pdf