LIVE UPDATES

ज्येष्ठ पत्रकार कै‌. उत्तम वाडकर यांना शोकसभेतून आदरांजली

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 21:07 PM
views 35  views

सावंतवाडी : कै. उत्तम वाडकर यांच्यारूपाने नेहमीच प्रसंगाला धावून जाणारा आणि कडवट शिवसैनिक प्रत्येकाने अनुभवला होता. ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. ते त्याच्या सुखदुःखात नेहमीच बरोबर असायचे, अशा शब्दांत अनेकांनी ज्येष्ठ पत्रकार तथा शिवसैनिक कै. वाडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

वाडकर यांचे अलिकडेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सावंतवाडीतील पत्रकार शिवसैनिक यांच्या उपस्थितीत येथील श्रीराम वाचन मंदिर येथे सोमवारी सायंकाळी शोकसभेच आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक भाई देऊलकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, रूपेश राऊळ,  समीर वंजारी, सुधीर पराडकर संदीप टोपले, रमेश गांवकर सुरेश भोगटे, रमेश बोंद्रे, सीमा मठकर, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, उदय पारिपत्ये, राम वाडकर, विलास जाधव, महेश पांचाळ, रमेश गांवकर, रेमी आल्मेडा, प्रमोद सावंत, रश्मी माळवदे, श्री. वाडकर, श्री‌.शितोळे, निशांत तोरसकर, राकेश परब, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, अनंत जाधव, सचिन रेडकर, रूपेश हिराप, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, शैलेश मयेकर, प्रसाद माधव, संदेश पाटील, निखील माळकर आदि उपस्थित होते. वाडकर हे सर्व क्षेत्रात पारंगत व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्या काळात एक शिवसैनिक म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास जिंकला होता. त्यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल अतूट असे प्रेम निर्माण झाले होते. त्या प्रेमापोटी त्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात शिवसेना विस्तारण्याचे काम त्यांनी केले. गावागावात जाऊन शिवसैनिक घडवले, त्यांच्यातील अनेक वेळा कडवट शिवसैनिक आम्ही पाहिला आहे. नेहमीच अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी ते शिवसैनिकांच्या पाठीशी राहायचे शिवसैनिकांचे मनोबल उंचवायचे. एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असायचा. त्यामुळेच वाडकर यांच्याबद्दल शिवसैनिकात प्रेम निर्माण झाल्याचे दिसून आले.

पत्रकारिता क्षेत्रात ही त्यांनी नेहमीच वेगवेगळ्या विषयाला वाचा फोडली लेखणी चालवली असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले. वाडकर यांना पत्रकारिता क्रीडा सामाजिक क्षेत्राबद्दल नेहमीच आस्था असायची ते वेगवेगळ्या विषयावर बोलायचे असे ही उपस्थितांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाई देऊलकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, समीर वंजारी, रमेश बोंद्रे, चंद्रकांत कासार, अभिमन्यू लोंढे, सुरेश भोगटे, सुधीर पराडकर, रूपेश राऊळ, रमेश गांवकर, गजानन नाईक, संदीप टोपले, प्रा. रूपेश पाटील विनायक गांवस आदिंनी शोकसभेत वाडकर यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या तसेच त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.