LIVE UPDATES

माजी सभापती प्रकाश कवठणकर यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 16:30 PM
views 100  views

सावंतवाडी : तालुक्यातील कवठणी गावचे सुपुत्र, पंचायत समिती सावंतवाडीचे माजी सभापती तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश श्रीधर कवठणकर (वय ६५) यांचे शनिवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

प्रकाश कवठणकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध, विकासकामांप्रती असलेली तळमळ आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे त्यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या निधनाने कवठणीसह संपूर्ण सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.