
सावंतवाडी : आंबोली बंगलेवाडी या ठिकाणी सांबराच्या पिल्लाच्या मागे भटके कुत्रे पाठी लागलेत अशी माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची आर. आर. टी. टीम घटनास्थळी दाखल होऊन सांबराच्या पिल्लाला रेस्क्यू केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांच्या सल्ल्याने या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. रेस्क्यू करताना आंबोली वनपाल सम्राट पाटील वनरक्षक अनिकेत आवारे ,अनिकेत देशमुख, वनमजूर मंगेश सावंत, रेस्क्यू टीमचे सदस्य प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर, प्रथमेश प्रदीप गावडे, श्रीकृष्ण गवस, सुरेश कोकरे, वसंत गावडे आणि ग्रामस्थ विशाल सावंत, कृष्णा गावडे, करण गावडे ,किशोर गावडे ,कुणाल गावडे, अक्षय गावडे, दादा नाटलेकर, आशिष गावडे यांनी मोलाची भूमिका बजावली.










