LIVE UPDATES

सावंतवाडीत ७ नोव्हेंबरला भाजपतर्फे नरकासुर स्पर्धा

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक यांचा पुढाकार : खुल्या गटातील विजेत्याला ५७ हजार ५७ रुपयांचे बक्षीस
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 08:23 PM
views 24  views

सावंतवाडी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा जगन्नाथराव भोसले उद्यान येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेसाठी खुल्या गटात पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक ५७ हजार ५७ रुपये ठेवण्यात आले आहे. द्वितीय क्रमांक बक्षीस २५ हजार ५७ रुपये असणार आहेत. तृतीय व उत्तेजनार्थ तीन बक्षीसे, तर लहान गटात प्रथम क्रमांकांचे बक्षीस १० हजार ५७, द्वितीय, तृतीय क्रमांक रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. या आयोजनासाठी भाजपचे नेते विनोद राऊळ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि भाजप युवा नेते विशाल परब यांचे सहकार्य लाभत आहे.

नरकासुर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी हितेन नाईक (८२९१४९४८९७) किंवा पंकज तुळसुळकर (९१३०६८३४७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.