LIVE UPDATES

Damini Palav Murder Case : संशयित साहिल धुरीला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी

दामिनी पालव खून प्रकरण : सुरा, कपडे, मोबाईलसह दुचाकी जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 01:35 PM
views 164  views

कुडाळ : वर्दे येथील दामिनी किरण पालव खून प्रकरणात संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी याची पोलीस कोठडी आज २४ ऑक्टोबर रोजी संपल्यानंतर त्याला आज दुपारी पुन्हा अधिक तपासासाठी कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कुडाळ न्यायालयाने आणखी चार दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी आतापर्यंत संशयित आरोपीकडून सुरा, कपडे, मोबाईल आणि गुन्ह्यांत वापरण्यात आलेली हिरोहोंडा दुचाकी ताब्यात घेतल्याची माहिती कुडाळ न्यायालयाला दिली. तसेच या प्रकरणात अधिक चौकशी आवश्यक असून त्यामुळे वाढीव पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावेळी कुडाळ न्यायालयाने पोलीस प्रशासनाने केलेली मागणी मान्य करीत आणखी चार दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.