
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक अॅड. नकुल पार्सेकर यांच्या साहित्यिक प्रवासावर आधारित विशेष मुलाखतीचे प्रसारण दूरदर्शनच्या ‘डीडी सह्याद्री’ वाहिनीवर मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. ‘शब्दांच्या वाटेवर’ या संकल्पनेवर आधारित ही अर्ध्या तासाची मुलाखत असून, त्यातून अॅड. पार्सेकर यांच्या आतापर्यंतच्या साहित्यिक वाटचालीचा उलगडा होणार आहे.
मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मिती प्रमुख राजेश दळवी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. दूरदर्शनच्या अधिकारी रश्मी समर्थ यांनी मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रम प्रसारण अधिकारी वनिता गौंडाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचे निवेदन रेश्मा उपासे यांनी केले असून, व्हिडिओ चित्रीकरणाची जबाबदारी गौरव जाधव यांनी सांभाळली आहे.
सामाजिक कार्यासोबतच साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या अॅड. नकुल पार्सेकर यांच्या साहित्यिक प्रवासाची माहिती या मुलाखतीतून प्रेक्षकांना मिळणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








