LIVE UPDATES

आंबा-काजू नुकसानभरपाईसाठी न्हावेलीतील शेतकरी आक्रमक

तातडीने रक्कम जमा करण्याची तहसीलदारांकडे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 17:10 PM
views 31  views

सावंतवाडी : नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा व काजू पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी न्हावेलीवासीयांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 

नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाई काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी हेमचंद्र सावळ, मोहन पालेकर, दादा परब,मोहन नाईक, एकनाथ परब,गोविंद गावडे, सुनील न्हावेलकर,रामचंद्र परब, रमेश निर्गुण,आनंद कोचरेकर, प्रसाद गावडे आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपस्थितांना सांगितले की, तांत्रिक कारणामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. याबाबत मंत्रालय स्तरावर संपर्क साधून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर रक्कम जमा होईल असे आश्वासन दिले.