LIVE UPDATES

शैक्षणिक प्रगतीसाठी पालक सरसावले

वेंगसर शाळेला ५५ हजारांची शैक्षणिक साहित्याची देणगी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 17:52 PM
views 23  views

वैभववाडी : विद्या मंदिर वेंगसर नं. १ शाळेला पालक व ग्रामस्थांकडून विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य शाळेला देणगी स्वरूपात दिले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी वेंगसर येथील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला.येथील प्राथमिक शाळेला विविध साहित्य मोफत पुरविण्यात आले.

यामध्ये संतोष बेलवलकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना ओळखपत्र, तर माजी सरपंच सुभाष कांबळे यांच्याकडून शाळेला कलर प्रिंटर देण्यात आला. तसेच पालकांनी शैक्षणिक साहित्य, समाजसुधारकांचे फोटो आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. सुमारे ५५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य शाळेला भेट स्वरूपात देण्यात आले.

शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी पालकांनी दिलेल्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. शाळेच्या प्रगतीसाठी पालकांनी दाखविलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या शैक्षणिक उठावासाठी सहकार्य करणारे सर्व पालक, संतोष बेलवलकर व सुभाष कांबळे यांचे मुख्याध्यापक प्रकाश नारकर व शिक्षकवृंद यांनी आभार मानले .