LIVE UPDATES

सर्वसाधारण सभेच चित्रीकरण करावे की करू नये ?

न.प.च्या सर्वसाधारण सभेत मुद्दा : नगरसेवकांच्या चर्चेअंती काय ठरले ?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 19:05 PM
views 581  views

सावंतवाडी : सावंतवाडी न.प.ची सर्वसाधारण सभा लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आयत्यावेळीच्या विषयात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने सभेचे पत्रकारांनी चित्रिकरण करण्यातबाबत किंवा प्रशासनाकडून ते पुरविण्याबाबतचा मुद्दा घेतला गेला. नगराध्यक्षांनी सभागृहाला मत मांडण्याची विनंती केली असता यावर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी आपली मते मांडली. 

यावर प्रशासनाकडून चित्रीकरण करून पत्रकारांना द्यावं, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ते कार्यरत असल्याचे सभापती आनंद नेवगी यांनी म्हटले. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने मागणी रास्त असून ती मान्य करावी असे नगरसेवक देवा टेमकर यांनी तर कामात पारदर्शकता रहावी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अंमलबजावणी होण्यासाठी परवानगी द्यावी असे, अँड निता सावंत-कविटकर यांना म्हटले. 

दरम्यान, सभापती प्रतिक बांदेकर यांनी प्रक्षेपण करण्यासह इतर गोष्टींसाठीचे बजेट नगरपरिषदेचे नसून लेखी नोंदी ठेवण्याची परवानगी पत्रकारांना दिलेली आहे. त्यामुळे सभेच चित्रीकरण करू नये अस मत व्यक्त केले. सभापती दिपाली भालेकर यांनीही विरोध केला. यावेळी लोकसभा, विधानसभांचे कामकाज लाईव्ह होते. त्यामुळे कामात पारदर्शकता येण्यासाठी सभेचं चित्रीकरण व्हावं व चांगल्या गोष्टी देखील दाखवल्या जाव्यात असे मत उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी मांडले.

सभापती मोहिनी मडगावकर यांनी देखील चित्रीकरणासाठी परवानगी दिली जावी असे म्हटले. तर विरोधी गटाकडून नगरसेवक संजू परब यांनी नगराध्यक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी असे आवाहन केले. यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद ठेवाव अशा सुचना दिलेल्या असताना सभेचं चित्रीकरण केलं गेलं. सभागृहातील चर्चा बाहेर दिसताना चुकीच्या पद्धतीने दिसते. त्यामुळे सावंतवाडीची संस्कृती चुकीच्या पद्धतीने बाहेर जात आहे. सभागृहातील भांडण बाहेर जाणं हे सावंतवाडीच्या संस्कृतीला शोभणार नसून सभा संपल्यानंतर सर्व सदस्य एकत्रच असतात. मात्र, केवळ वाद बाहेर जातो‌. चित्रीकरणाला परवानगी आदिही दिलेली नव्हती. त्यामुळे सभेच चित्रीकरण करण्यात येऊ नये असे आदेश नगराध्यक्षांनी दिले.