LIVE UPDATES

Sawantwadi News : जैवविविधतेचे नुकसान करणारे प्रकल्प घातक

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे आरोप
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 04, 2026 03:35 PM
views 44  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : सह्याद्रीच्या पट्ट्यात विपुल प्रमाणात जैवविविधता, वन्यप्राणी, पक्षी आणि दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. एका बाजूला केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय पश्चिम घाट इको-सेन्सिटिव्ह झोन (जैविक संवेदनशील क्षेत्र) घोषित करण्यासाठी हरकती मागवत आहे.

तर दुसरीकडे याच सह्याद्री पट्ट्यात तब्बल २३ वीजनिर्मिती 'पंप स्टोरेज' प्रकल्प लादले जात आहेत. हे प्रकल्प पर्यावरण, जलस्रोत आणि जैवविविधतेचे अतोनात नुकसान करणारे आहेत, असा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

डॉ. परुळेकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, पश्चिम घाटासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ गावांचा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश करण्याबाबत हरकती नोंदवल्या जात आहेत. असे असतानाच कोकण आणि पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे प्रकल्प आणले जात आहेत.

युरोपने नाकारलेली आणि प्रचंड पाणी वापरणारी 'डेटा सेंटर' आज आपल्याकडे लादली जात आहेत. पंप स्टोरेज पावर प्रकल्पासाठी डोंगरावरील सुमारे २०० वर्षांपूर्वीची जैवविविधता आणि बेसुमार वृक्षतोड केली जाणार आहे. यामुळे पाणी स्त्रोत,वन्यजीव व पक्षी प्रजाती नष्ट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

सध्या 'सुपर एल निनो'मुळे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. पावसाळा संपताच वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू झाले असले तरी प्रशासन केवळ फोटोबाजी करून दुष्काळाचा सामना करण्याचा दिखावा करत आहे असे त्यांनी म्हटले आहे.


ताजी बातमी

View all

Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
US Midterm Election Results 2026 showing Democratic Party victories in the Senate and House, with Donald Trump and Indian-American candidates in the spotlight.
US Midterm Election Results 2026 : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का, डेमोक्रॅट्सला मिळाले बहुमत
November 04, 2026
Mumbai Suburban men's and women's teams celebrate their victories at the Mumbai University Inter-Zonal Kabaddi Championship in Ratnagiri.
मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी
November 04, 2026
सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
घोडेमुख पेंडूरात ८ नोव्हेंबरला डबलबारी भजनाचा सामना
November 04, 2026
Kudli to Chiplun ST bus accident near Ambekarwadi Shir Bhatle in Guhagar
ST Bus Accident : धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने नियंत्रण सुटले अन् घडला अपघात
November 04, 2026