LIVE UPDATES

Ganpati decoration competition : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतर्फे इकोफ्रेंडली गणपती सजावट व रिल्स स्पर्धा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 12, 2026 19:21 PM
views 27  views

वैभववाडी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने ‘इकोफ्रेंडली गणपती सजावट व रिल्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देतानाच नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेचा कालावधी १४ ते २६ सप्टेंबर असा असून सहभागी स्पर्धकांनी एक ते दीड मिनिटांचा व्हिडिओ तयार करून सादर करायचा आहे. या स्पर्धेसाठी गणेश चतुर्थीचे स्वागत, बाप्पाची आकर्षक सजावट, गणेश आरती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे विषय ठेवण्यात आले आहेत.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये असे बक्षीस आहे.

गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत जनजागृती व्हावी तसेच शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील गणेशोत्सव, सजावट आणि धार्मिक परंपरा सर्जनशील पद्धतीने मांडाव्यात, यासाठी नगरपंचायतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे आणि मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी केले आहे.