
सावंतवाडी : तालुका काँग्रेस कडून सावंतवाडी नगरपालिकेला धडक देत सालईवाडा परिसरातील पिण्याच्या पाण्याला ड्रेनेजचा वास येत असल्याबाबत मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यात आला. यामुळे तेथील लोकांच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो असे त्यांनी म्हटले असून त्यासाठी परिसरातील नागरिकांसह आज सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.
नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेत. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, स्थानिक नागरिक आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर , आफताब हेरेकर, बाळा नमशी, विनायक ओटवणेकर, पीटर फर्नांडिस, इनास मारतीस आदी उपस्थित होते.










