
सावंतवाडी : येथील डॉ . परूळेकर नर्सिंग होम मध्ये एकूण आठ गरजू लाभार्थी व्यक्तींना मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश डॉ . जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सावंतवाडी येथील पांडुरंग नमशी या विद्यार्थ्याला आणि सांताक्रूझ मुंबई येथील अल्पिता शेडगे या विद्यार्थ्यानीला शैक्षणिक आर्थिक सहाय्यासाठी तसेच मसुरे येथील ओमप्रसाद शेडगे या रक्ताच्या कर्करोगाने पिडित, ओटवणे येथील अक्षता जाधव या स्तनाच्या कर्करोगाने पिडित, पेंडूर येथील भाग्यश्री राऊत या आतड्यातील रक्तस्त्राव आणि ॲनिमिया आजाराने पिडीत,वर्दे येथील वासुदेव सावंत या पित्ताशयाच्या आजाराने पिडीत,पेंडूर येथील संजय गावडे या अपस्मार आणि मानसिक मतीमंदतेने पिडीत, विद्या ढवळे या किडनीच्या आजाराने पिडीत आणि नेमळे येथील रेश्मा झोरे या शस्त्रक्रियेनंतर झालेल्या ग्रॅन्यूलोमा आजाराने पिडीत अशा रूग्णांना ही आर्थिक मदत देण्यात आली.










