LIVE UPDATES

हत्ती प्रश्नावर आमदार, शेतकरी - वनविभागाची तुफानी चर्चा

चर्चेतून काय निष्पन्न..?
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 05, 2026 17:10 PM
views 27  views

दोडामार्ग : तालुक्यात गेली अनेक वर्षे हैदेस घालणाऱ्या वन्य हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी शासना बरोबर हतीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व न्यायलयात जावे यासाठी तालुक्यातील सर्व  ग्रामपंचायतने हत्ती बंदोबस्ताचा ठराव घेऊन न्यायालयात रीट पिटीशन दाखल करावी या संदर्भात सूचना आमदार केसरकर यांच्याकडून करण्यात आल्या. तसेच आजरा किंवा तिलारी येथे हत्ती ग्राम उभारण्या संदर्भात आपली बैठक वनमंत्र्यासोबत होणार त्याचाही निर्णय लवकरच सुटणार असल्याचे केसरकर म्हणाले.

हत्ती बंदोबस्त व नुकसानि संदर्भात बैठक येथील वनविभाग कार्यालय येथे पार पडली. यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत उप वनसंरक्षक मिलिश शर्मा, वैभव बोराटे, उपसभापती गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, पं. स. सदस्य सायली निबाळकर, भगवान गवस, दोडामार्ग वनरक्षक संभाजी पाटील शेतकरी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 यावेळी हत्ती व वन्य प्राण्याकडून होणारी बागायती शेतीची नुकसानी या संदर्भात चर्चा जरण्यात आली. हत्ती प्रश्न कायम सोडविण्यासाठी आपतग्रस्त शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. काहींनी तर उवनसंरक्षक याना धारेवर धरले. अनेक प्रश्न उपस्थित केल्या नंतर हत्ती नुकसानी संदर्भात वाढीव नुकसान भरपाई देण्या संदर्भात व जमीनदोस्त झालेला शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी वनवीभागाने उपाययोजना कराव्यात या संदर्भात ही चर्चा करण्यात आली.

दरम्यान उपस्थित शेतकरी पंकज गवस म्हणले की, गेली 20 - 22 वर्षे आम्ही हेच ऐकतोय की असं करणार तस करणार, मात्र, प्रत्यक्षात काहीच नाही. सर्व काही आहे ते फक्त कागदावरच. माझ्या बागायतीतील साधारण 40 नारळाची झाडे हत्तीनी उडविली. मग पुन्हा झाडे लावणे मला काय शक्य नाही. मग मी ही नुकसानी कां सोसावी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत अधिकारी व आमदार यांना जाब विचारला. यावेळी आमदार केअरकर यांनी शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी त्याला वनविभागाकडून ती झाडे पुन्हा लावण्यासाठी हातभार लावावा अशा सूचना ही दिल्या. 

यावेळी उपसभापती गवस यांनी झाडे जमीनदोस्त हत्तीनी केली की त्याची नोंद 7/12 वर तशीच असते. ती कमी केली जातं नाही. ती नोंद कमी केली तर शेतकऱ्यांना वनविभागाच्या योजनेतून झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते, यावेळी वनविभागाने तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून ती नोंद कमी करून घ्याव्या अशा सूचना यावेळी दिल्या.

दरम्यान, आमदार केसरकर म्हणाले की, हत्तीग्राम साठी 48 कोटी रुपयाचे इस्टीमेट तयार झालेल आहे. लवकरच आपली बैठक वनमंत्री यांच्यासोबत होऊन हा प्रश्न मार्गी लागणार आहे. आजरा किंवा तिलारी येथे हा प्रकल्प होणार असून गेळेचा जसा प्रश्न वनमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन मार्गी लागला तसाच हाही प्रश्न मार्गी लागणार आहे. 

आजऱ्या पेक्षा तिलारीची जागा जास्त आहे. त्यामुळे तिलारीत हा प्रकल्प उभारण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. हत्ती कॅम्प आजऱ्यात झाला तरी मला आनंद होईल किंवा तिलालरीत झाला तरी आनंद होणार. असे केसकर म्हणाले.