
दोडामार्ग : साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपा बूथ अध्यक्ष चंद्रकांत जयराम मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील काही दिवसांपासून साटेली भेडशी ग्रामपंचायत चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती. तत्कालीन उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यावर सरपंच यांच्यासह आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून संमतही केला होता. त्यानंतर या प्रक्रियेनंतर यात नवा ट्विस्ट निर्माण होत हा अविश्वास मंजूर होण्यासाठी ग्रामसभेने निर्णय दिला पाहिजे त्यानुसार ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेत सरपंच आणि आठ सदस्य यांनी घेतलेल्या अविश्वास ठरावाप्रमाणेच ग्रामस्थांनीही अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला. व श्रीम.डिंगणेकर यांना पायउतार व्हावे लागले.
या सर्व घडामोडींनंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी सरपंच छाया धर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपसरपंच पदासाठी चंद्रकांत जयराम मयेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने मयेकर यांची साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.सरपंच छाया धर्णे, ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी,विष्णू सुतार,शोभना जुवेकर, सेजल धर्णे,संपदा गवस,दिपाली मोरजकर,निलपर्णा पार्सेकर, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद परमेकर, प्रवीण चौगुले आदी उपस्थित होते.
उपसरपंच निवडीनंतर चंद्रकांत मयेकर यांचे सरपंच, सहकारी सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांच्यासह भाजपा जिल्हा चिटणीस सुधीर दळवी, शामसुंदर धर्णे, वैभव इनामदार, वैभव सुतार, संजय धर्णे, हृषीकेश धर्णे, सिद्धेश कासार, लक्ष्मण गवस, दत्ताराम धर्णे आदी ग्रामस्थ व्यापारी वर्ग, मित्रपरिवार यांनी ग्रामपंचायत येथे येत नवनिर्वाचित उपसरपंच मयेकर यांचे अभिनंदन केले











