LIVE UPDATES

कु. गणेश गवसची इस्रो सहलीसाठी निवड

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 14, 2026 20:55 PM
views 31  views

दोडामार्ग : डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील इयत्ता सातवीच्या 24 विद्यार्थ्यांची निवड झाली. आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथील इस्रो या ठिकाणाला ही सहल जाणार आहे. यामध्ये सासोली येथील जिल्हा परिषद शाळा पाटये पुनर्वस येथील कु. गणेश विजय गवस याची निवड झाली आहे. 

कु. गणेश याने इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षण पाटये पुनर्वसन शाळेमध्ये घेतले आहे. सन 2026 मध्ये इयत्ता सातवी मध्ये घेतल्या गेलेल्या एस. टी. एस. परीक्षा व गुरुकुल स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षांमध्ये  त्याने घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. त्याच्या या यशाबद्दल गावचे सरपंच प्रवीण गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ तसेच शिक्षक आनंद नाईक, दिलीप कळणेकर, संजय देसाई यांनी अभिनंदन केले आहे.