LIVE UPDATES

आयआयए रत्नसिंधु सबसेंटरचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 14, 2026 18:50 PM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update#

रत्नागिरी : भारतीय वास्तुविशारद संस्था (आयआयए) रत्नसिंधु रत्नागिरी-सिंधुदुर्ग सबसेंटरच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभ नुकताच विवा एक्झिक्युटीव्ह येथे झाला.यामध्ये अध्यक्ष मकरंद केसरकर (रत्नागिरी), उपाध्यक्ष गौरी सामंत (वेंगुर्ला), कोषाध्यक्ष संजना शेटे (रत्नागिरी), सचिव श्रेया इंदुलकर (रत्नागिरी), सल्लागार आर्किटेक्ट संतोष तावडे, कार्यकारिणी सदस्य निलेश गुंदेचा (रत्नागिरी), प्रियदर्शन कोपरकर (दापोली), अपूर्वा मोहिते (रत्नागिरी), हर्षद सरवणकर (रत्नागिरी), स्वीकृत सदस्य मेघा पंडित बारटक्के (दापोली), शलिन कापडी (संगमेश्वर) व इतर सदस्यांची फेरनियुक्ती झाली.

या समितीचा कार्यकाळ २०२६ ते २०२८ असा दोन वर्षांचा आहे. दोन वर्षांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आर्किटेक्ट फॉर लाईफ या उपक्रमाअंतर्गत सामाजिक जबाबदारीच्या नात्याने रविवारी (ता. १८) सकाळी १० वाजता लायन्स आय केअर हॉस्पीटल, एमआयडीसी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून कोकणातले पहिले आयआयए फेलो म्हणून आर्किटेक्ट संतोष तावडे यांचा सत्कार करण्यात आला.