LIVE UPDATES

सावंतवाडीत दिवाळी अंक वाचक योजना सुरू

१०० रुपये वर्गणीत १०० दिवाळी अंक घरबसल्या वाचण्याची संधी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 06, 2026 07:44 PM
views 51  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी ग्रंथालयातर्फे सभासद, वाचकांना दीपावली निमित्त दिवाळी अंक वाचक योजना सुरु केली आहे. दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन ग्रंथालयाच्या सभागृहात आज कोकण रेल्वे अधिकारी, साहित्यिक मधुकर मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

१०० दिवाळी अंक १०० रुपये वर्गणी आणि १०० रुपये अनामत मध्ये ०६ नोव्हेंबर २०२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत वाचकांना घरी वाचावयास उपलब्ध करण्यात येतील. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. संदिप निंबाळकर, सहकार्यवाह गणेश बोर्डेकर, प्रा. प्रवीण बांदेकर. गोविंद वाडकर, डॉ. सुमेधा धुरी, विठ्ठल कदम, नंदू पाटील, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, ग्रंथपाल महेंद्र पटेल, कर्मचारी वृंद आणि वाचक उपस्थित होते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त वाचकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. संदिप निंबाळकर यांनी केले आहे.