LIVE UPDATES

दिवाळी पहाटसाठी ओंकार मळगावात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 08, 2026 06:59 PM
views 112  views

सावंतवाडी : गेले कित्येक दिवस तालुक्यात असलेल्या ओंकार हत्तीने आज दिवाळीच्या पहाटे पहाटे मळगाववासियांना दर्शन दिले. मळगाव- सोनुर्ली सीमेवरील दोन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील मंदिराकडे तो प्रथम निदर्शनास आला. 

त्यानंतर ओंकार माघारी फिरला व चॉकलेट फॅक्टरी कडून झाराप पत्रादेवी महामार्ग ओलांडून माजगाव जंगलाच्या दिशेने रवाना झाला. यावेळी महामार्गावर त्याला पाहण्यासाठी आबाल-वृद्धांनी तोबा गर्दी केली होती. त्याची एक झलक प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये कैद केली. तसेच याची देही याची डोळा त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांना ओंकार पासून लोकांना दूर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करताना दिसत होते.