LIVE UPDATES

देवगड व्यापारी संघाकडून वनराई बंधाऱ्यांसाठी एक हजार पिशव्या सुपूर्द

पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांच्याकडे पिशव्या प्रदान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 10, 2026 19:40 PM
views 53  views

देवगड : यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांत जाणवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने देवगड व्यापारी संघाच्या वतीने वनराई व कच्चे बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या एक हजार पिशव्या आज देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यास मदत व्हावी, भूजल पातळीत वाढ व्हावी आणि आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे उभारण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करून जलसंधारणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या वेळी देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, महिला व्यापारी अध्यक्ष सौ. प्रियांका साळसकर, तृप्ती पारकर, योगेश चांदोस्कर, पाणीपुरवठा अधिकारी चारू पारकर, नगर अभियंता विवेक खोत व अमर उपस्थित होते. जलसंधारणाच्या या उपक्रमासाठी देवगड व्यापारी संघाने पुढाकार घेतल्याने वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला सहकार्य मिळणार आहे.