LIVE UPDATES

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

देवगडमध्ये उमा मिलिंद पवार हायस्कूलमध्ये स्तुत्य उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 03:44 PM
views 58  views

देवगड : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उमा मिलिंद पवार हायस्कूल येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, भाजप शहर अध्यक्ष वैभव करंगूटकर, भाजप शहर युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद पाटील, जिजाऊ फाउंडेशनचे  साहिल गोरे तसेच श चारू सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





ताजी बातमी

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी स्थानकांवर वातानुकूलित कक्षांचे उद्या लोकार्पण
November 19, 2026