LIVE UPDATES

‘पोषण महा’ महिला पोषण महाआरतीने उत्साहात

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 05, 2026 20:19 PM
views 14  views

देवगड :  देवगड तालुक्यातील तळवडे येथे ‘पोषण महा’ निमित्त महिला पोषण महा आरतीने उत्साहात पार पडला. बालविकास विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात टेक होम रेशन पासून विविध पौष्टिक व चविष्ट पाककृती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

लहान मुलांसह गर्भवती व स्तनदा मातांच्या आहारात पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा समावेश व्हावा, यासाठी THR चा योग्य वापर कसा करता येईल, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यक्रमात ‘पोषण महा’महिला पोषण महाआरती ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका रेश्मा कदम ,संगीता मुणगेकर ,समीक्षा साटम, मदतनीस अनुराधा शेलार, शुभांगी लाड, माजी सरपंच पुजा दुखंडे, बचत गट सि रा पी दीक्षा लब्दी,सुहानी लब्दी,अनुष्का दुखंडे,जयश्री दुखंडे,दीप्ती दुखंडे ,अर्चना दुखंडे, व इतर महिला पोषण माह आरती घेतली सई पोषण देश रोशन ही संकल्पना यावेळी राबविण्यात आली.