LIVE UPDATES

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर सिंधुदुर्ग दौऱ्यावर

९ ऑक्टोबरला आढावा बैठक : समस्यांचा घेणार आढावा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 18:52 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

९ ऑक्टोंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजता सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. दुपारी १ ते २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम, २०१३ च्या अंमलबजावणी बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी निवारणाकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक होणार असून, आढावा बैठकीनंतर अध्यक्षांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी २ ते ३ वाजता (राखीव). सायंकाळी ४ वाजता सिंधुदुर्ग येथून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.