LIVE UPDATES

हिंदळे येथील युवकाचे अपहरण..?

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 05, 2026 17:13 PM
views 57  views

देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे खडकीवाडी येथील सूरज सुनील मेस्त्री (३२) याचे अपहरण झाल्याची फिर्याद त्याचे वडील सुनील राजाराम मेस्त्री (६२) यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार देवगड पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास सूरज मेस्त्री हा घराच्या अंगणात बसून मोबाईल बघत होता. वडिलांनी त्याला घरात ये म्हणून सांगितले. मात्र, तो घरात आला नाही. थोड्यावेळाने त्याच्या वडिलांनी घराबाहेर जाऊन बघितले असता तो दिसून आला नाही. याबाबत वडील सुनील मेस्त्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करत आहेत.