LIVE UPDATES

पाणी पुरवठा विभागातील २७ वर्षांच्या खर्चाच्या चौकशीची मागणी

जिल्हाधिकारी यांना पांडुरंग गावडे यांनी दिल निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 06, 2026 18:31 PM
views 57  views

सावंतवाडी : नगरपरिषद पाणीपुरवठा दुरुस्तीचा मासिक खर्च दशलक्षांवरूश अडीच लाखांवर आल्याचा दावा करत सन १९९९ ते २०२६ पर्यंतच्या दुरूस्ती साहित्य खरेदीची चौकशी करण्याची मागणी शहरातील नागरिक पांडुरंग गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. २७ वर्षांतील पाणी पुरवठा विभागासाठी खरेदी करण्यात आलेल्या खर्चाचा स्वतंत्र लेखापरीक्षणाद्वारे सखोल तपास करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील दुरूस्ती साहित्यावरील मासिक खर्चाबाबत त्यांनी लक्ष वेधले आहे. दशलक्षांवरूश अडीच लाखांवर आलेलं बील हा बदल जिल्हाधिकाऱ्याच्या पाहणीचा परिणाम ? पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनांचा प्रभाव ? की पाणीपुरवठा विभागाल नव्याने कार्यरत झालेल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याच्या कामकाजामुळे झाला ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर १९९९ पासून जून २०२६ पर्यंत पाणीपुरवठा विभागासाठी खरेदी करण्यात आलेल्या दुरुस्ती साहित्याचा आणि त्यावरील खर्चाचा स्वतंत्र लेखापरीक्षणा‌द्वारे सखोल तपास करावा, अशी मागणी श्री. गावडे यांनी केली आहे.