LIVE UPDATES

माजगाव येथे मांगरावर झाडाची फांदी पडून नुकसान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 06, 2026 20:54 PM
views 63  views

सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव दळवीवाडी येथील दिपेश महादेव कानसे यांच्या मांगरावर झाडाची फांदी पडून सुमारे १० हजार इतके नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. 

मांगरालगत असलेल्या झाडाची वाळलेली फांदी मांजराच्या छपरावर पडली. या घटनेत सिमेंट पत्रे तुटल्यामुळे त्यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच माजगाव तलाठी ज्योती गुरव तसेच पोलीस पाटील विनोद जाधव त्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कानसे कुटुंबियांनी केली आहे.