LIVE UPDATES

ravindra chavan : राजकारणापलीकडील मैत्री जपत अतुल रावराणेंकडून रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 12:11 PM
views 75  views

वैभववाडी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. अतुल रावराणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात राजकारणापलीकडे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. या मैत्रीच्या नात्यातून रावराणे हे दरवर्षी चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतात.

यंदाही त्यांनी चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याला पुढील काळातही यश मिळावे, तसेच त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी शुभेच्छा अतुल रावराणे यांनी व्यक्त केली. वाढदिवसानिमित्त झालेल्या या शुभेच्छा भेटीत दोघांमधील स्नेहपूर्ण मैत्रीचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.