LIVE UPDATES

तरूणीला धमकावुन अत्याचार प्रकरण | दशरथ बोलयेवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 20, 2026 20:27 PM
views 28  views

वैभववाडी : तरूणीला धमकावुन  तिच्यावर अत्याचार  करणारा संशयित दशरथ आत्माराम बोलये (वय-४५) याच्याविरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्येत सुधारल्यानंतर पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाकरीता विभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत हे आज जांभवडे येथे आले होते.

तालुक्यातील जांभवडे या गावी आपल्या आई वडिलासोबत राहत असलेल्या  २१ वर्षीय तरूणीवर तेथीलच संशयित बोलये याने तीन दिवस अत्याचार केले. कुणाला काही सांगीतले तर आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे भयभीत अवस्थेतील पिडीतीने अत्याचार होत असल्याची माहीती आपल्या चुलत बहीणीला सांगितले. तिने हा प्रकार पिडितेच्या आईला सांगितला. तिच्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आला. शनिवारी सकाळी पिडीता आणि तिची आई वैभववाडी पोलीसांत दाखल झाली.पोलीसांनी तिची तक्रार दाखल केली.संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.

त्यानतंर पोलीसांनी तातडीने जांभवडे गाठत संशयित बोलये याला ताब्यात घेतले. पोलीस स्थानकात आणुन प्राथमीक विचारणा करताच संशयित बोलयेची बोलतीच बंद झाली. त्याला अस्वस्थ वाटु लागले. त्यामुळे पोलीसांनी त्याला येथील ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. रात्री उशिरापर्यत त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, पोलीसांनी त्यांच्याविरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार आणि ॲट्रासिटीचा गुन्हा असल्यामुळे या प्रकरणाचा तपास सावंतवाडीचे विभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्याकडे देण्यात आला आहे. आज भागवत हे वैभववाडीत दाखल झाले. त्यांनी प्राथमीक माहीती घेतल्यानतंर त्यांनी थेट जांभवडे गाठले. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे देखील आहेत. संशयित बोलयेच्या प्रकृतीत आज सुधारणा झाली. त्यानतंर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.