
सावंतवाडी : माजी नगरसेवक तथा सालईवाडा सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार यांचे काल रात्रीच्या सुमारास दुःखद निधन झाले. काल रात्री अल्प आजारान त्यांचे निधन झाले. स्वार हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बराच काळ कारभार सांभाळला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्वार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










