
वेंगुर्ला : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ वे वेंगुर्ला तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन सन २०२६-२७ हे शुक्रवार २७ व शनिवार २८ नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, निरीक्षण क्षमता आणि संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी २ वाजता वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, उद्घाटक म्हणून आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती सचिन देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच प्राथमिक गटातील प्रश्नमंजुषा व प्रतीकृती मांडणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. शनिवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक व माध्यमिक गटातील प्रतीकृती परीक्षण, सकाळी १०.३० वाजता माध्यमिक गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धा, तर दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ होणार आहे.
तरी या तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय तुळसकर, अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेचे मुख्याध्यापक सचिन माने यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








