LIVE UPDATES

माजी विद्यार्थी सीताराम सुर्वेंकडून आरपीडीला ठेवीसाठी धनादेश

दुसऱ्या क्रमांकांने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांला देणार बक्षीस
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 19:55 PM
views 34  views

सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कूलमधून एस्.एस्.सी. परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांला बक्षिस देण्यासाठी आरपीडी हायस्कूल व ज्युनि. कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि कलंबिस्त हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सीताराम न्हानू सुर्वे यांनी 30 हजार रुपयांचा धनादेश शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक आणि उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांचेकडे सुपूर्त केला.

या रक्कमेच्या व्याजातून सुर्वे यांचे वडील कै. न्हानू सीताराम सुर्वे व आई काशिबाई न्हानू सुर्वे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एस्.एस्.सी. परीक्षेत आर.पी.डी. हायस्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षिस दिले जाणार आहे. सीताराम सुर्वे हे आर.पी.डी. हायस्कूलमधून एस्.एस्.सी. परीक्षेला १९७९ मध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. तसेच १९८१ मध्ये बारावी (सायन्स) उत्तीर्ण झाले होते. श्री. सुर्वे यांच्या देणगीमुळे आर.पी.डी. हायस्कूल व ज्युनि. कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यासाठी पंचविस लाखाहून अधिक रक्कमेच्या ठेवी शिक्षण प्रसारक मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशी माहिती डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली.