LIVE UPDATES

सभापती शंकर घारे, प्रितेश राऊळ यांनी केले दीपक नाईक व कुटुंबियांचे सांत्वन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 02, 2026 18:54 PM
views 76  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला भाजपचे पदाधिकारी वेतोरे येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक नाईक यांचा मुलागा राज नाईक (२२) याचे २७ ऑगस्ट रोजी निधन झाले. एकुलत्या एक मुलाच्या अचानक निधनाने नाईक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी दीपक नाईक व कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. 

यावेळी वेतोरे पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, पेंडूर सरपंच संतोष गावडे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी मकरंद परब, तुळस उपसरपंच नारायण कुंभार, पाल विकास सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, तुषार साळगावकर, भूषण सारंग, मातोंड ग्रा प सदस्य दिपेश परब, मारुती दौडशानट्टी, पत्रकार प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.