LIVE UPDATES

हूमरस परिसरात बस आणि कारचा अपघात

कारचे मोठे नुकसान, चालक जखमी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 14:55 PM
views 71  views

कुडाळ : सावंतवाडी आगाराच्या बसला आज दुपारी कुडाळ हूमरस परिसरात अपघात झाला. सावंतवाडी-रत्नागिरी मार्गावर धावणाऱ्या बसने  (MH 13 CU 8729)  एका रेनॉल्ट क्विड कारला (MH 07 AG 6538) मागच्या बाजूने धडक बसल्याने  हा अपघात घडला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कार चालक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज, १८ जुलै २०२६ रोजी सावंतवाडी आगाराची बस सावंतवाडीहून रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. बस हुमरस बस थांब्याच्या पुढे आली असता, समोर उभी असलेल्या रेनॉल्ट क्विड कारला बसने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

​चालक जखमी

या अपघातात कार चालक  पांडुरंग श्रीधर नाईक (वय ५४ वर्षे) हे जखमी झाले असून, त्यांना मुक्कामार लागला आहे. सध्या ते सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पांडुरंग नाईक हे मूळचे नेरूर (तालुका कुडाळ) येथील असून सध्या ते सावंतवाडीतील लक्ष्मीनगर भागात वास्तव्यास आहेत.

अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, या अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. कुडाळ आगार व्यवस्थापक  रोहित कारभारी नाईक हे या प्रकरणातील पुढील कार्यवाही आणि परिस्थिती हाताळत आहेत. पोलीस अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.