LIVE UPDATES

सोनुर्ली-होळीचा खुर्द येथे रेल्वे मार्गालगत अनोळखी इसमाचा मृतदेह

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 03, 2026 12:21 PM
views 76  views

सावंतवाडी : सोनुर्ली-होळीचा खुर्द परिसरात रेल्वे मार्गालगत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना काल रात्री उशीरा समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनुर्ली होळीचा खुर्द येथे रेल्वे ट्रॅकच्या उजव्या बाजूस अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. या इसमाचे टी-शर्ट झाडीत अडकलेले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रेल्वेतून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची खबर मंगेश केणी  यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद आज पहाटे करण्यात आली.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक श्री. लोहकरे, हेड कॉन्स्टेबल श्री. पाटील व पोलीस कॉन्स्टेबल श्री. खुराडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. धोत्रे करीत आहेत. मयताची ओळख अद्याप पटलेली नसून मृत व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.