
सावंतवाडी : एसपीके कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये राजमाता सत्वशीलादेवी भोंसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या शनिवारी १८ जुलै २०२६ रोजी मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी व पालकवर्ग, सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत एसपीके कॉलेज, सावंतवाडीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न होणार आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी योगेश चव्हाण (9404779941), गिरीश सावंत (9326611071), ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे रक्तदाते सदस्य मंगेश माणगावकर (7498621235) तसेच सचिव बाबली गवंडे (8390905269) आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर (9422967249) आणि यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.










