
सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सावंतवाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. सावंतवाडी तालुक्यातील शांतता, सुव्यवस्था व नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा चिटणीस महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई आणि रोनापाल सरपंच योगेश आदी उपस्थित होते.











